रसभारती – १

monument-162779_640

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु: |
यक्षचक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ||१||

कालिदासाचे मेघदूत म्हणजे आम्हा अलङ्कारशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या रत्नांची खाणच. जितके खणाल तितकी मौल्यवान रत्ने मिळत जातात. या काव्याचा अभ्यास फार मोठमोठ्या माणसांनी केला. ज्यांचे नावदेखील मनात आले तरी अतिशय नम्र वाटावे. पण ज्ञानदेवमहाराजांनी आमच्यासारख्या नवख्या, काव्यप्रान्ताशी अपरिचित, अडाणी माणसांची सोय करुन ठेवली आहे. त्यांनी आमच्यासारख्यांना धीर देण्यासाठीच बहुधा म्हटले आहे की “राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?”

अलंकारशास्त्रात पुढे काही लेखन करण्याची इच्छा आहे. त्याची सवय व्हावी म्हणून हा अल्पसा प्रयत्न. तो सर्वांनी गोड मानून घ्यावा ही विनंती.

वर दिलेला श्लोक हा मेघदूतातील पहिला श्लोक. त्याबद्दल बोलण्याआधी थोडी पार्श्वभूमी ठावूक असणे आवश्यक आहे. कालिदासाचा यक्ष हा कुबेराचा सेवक. कुबेराला पुजेसाठी भल्या पहाटे कमलपुष्पे आणून देण्याच्या कामावर याची नियुक्ती झाली होती. यक्षाला आपल्या पत्नीचा मोह न आवरल्याने त्याने पहाटे उठावे लागु नये म्हणून आदल्या रात्रीच मिटलेली कमळे आणून ठेवली. दुसर्‍या दिवशी ती फुलणारच होती. मात्र कुबेर शंकराची पूजा करीत असताना त्या अर्धस्फुट कमळातून एक भ्रमर बाहेर पडला ज्याने कुबेराच्या बोटाला दंश केला.

एकंदरीत प्रकार कुबेराच्या लक्षात आला. त्याने क्रोधाने यक्षाला वर्षभर पत्नीपासून तुझा वियोह होईल असा शाप दिला. त्याशापामुळे पत्नीपासून वियोग झालेला हा यक्ष रामगिरि पर्वतावर आला. ही मेघदूताची पार्श्वभूमी आहे.

अतुल ठाकुर

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

Leave a Reply

Your email address will not be published.