About Us

atul_thakur

राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

ज्ञानदेव महाराजांच्या या ओवीनंतर खरंतर फारसं काही बोलण्याची गरजच नाही. लेखनाची हौस हे एकमेव कारण या सर्व प्रपंचामागे आहे. मात्र कृपया कुणीही या लिखाणात साहित्यिक मूल्य पाहण्याचा प्रयत्न करू नये. मिळ्णार नाहीत. वाचताना आणि इतर वेळी जे आवडलं, जाणवलं, पाहिलं त्याची मित्रांशी चर्चा करावी अशा तर्‍हेचं हे लेखन आहे.

जे आवडलं नाही ते शक्यतो टाळलं आहे. ही भूमिका कुणाला किर्तनकाराची वाटली तर मला राग येणार नाही उलट आनंदच होईल कारण त्यात खूपच तथ्य आहे. भाबडेपणाची मला भीती वाटत नाही.

चिकीत्सकपणाचा माझा दावा नाही. शिवाजीमहाराजांसारख्या अनेक देवसदॄश महापुरुषांच्या कथा वाचताना मी भावनावश होतो. त्यांची पूजा बांधावीशी वाटते. जयजयकार यांचे नाही तर कुणाचे करायचे?

हा “संवाद” सर्वप्रथम स्वतःशी घडलेला आहे. या प्रक्रियेत थोडसं अन्तर्मुख व्हायला होतंच. अन्तर्मुख होताना स्वाभाविकपणे स्वतःच्या मनाचे बरेवाईट पैलू दिसु लागतात. या लेखनामुळे लक्ष आत वळुन माझ्या मनाचा मलाच अभ्यास घडला तर तो माझा सर्वात मोठा लाभ असेल. आणि हे सारं घडत असतानाच वाचकांनाही हे लेखन आवडलं तर लाभ द्विगुणित होईल हे नक्की!

अतुल ठाकुर

One of the meanings of perception is to understand sensory information. One cannot always rely on his senses as they are sometimes puzzling. If you trust your eyes then the radius of sun has to be equal to that of the ordinary saucer.

The point I wish to make that this writing and thoughts are my personal opinions and those have lots of limitations. They are written in a manner like discussing something informally with friends.

If you are interested in reading the opinion of an ordinary person through his simple perception, you are most welcome :)

Atul Thakur

 

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

Leave a Reply

Your email address will not be published.